Ad will apear here
Next
खूशखबर! मान्सून केरळात दाखल!


नवी दिल्ली :
सारे देशवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो मान्सून अखेर आज (आठ जून) केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने त्याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. 

केरळच्या अनेक भागांत आठ जून रोजी सकाळपासून चांगला पाऊस पडत आहे. हे मान्सून दाखल झाल्याचे लक्षण असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याचे प्रभारी महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी त्याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

दर वर्षी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो. यंदा पोषक स्थितीचा अभाव, तसेच अन्य वातावरणीय स्थितीमुळे हे आगमन आठ दिवस लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आठ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असेही हवामान खात्याने सांगितले होते. तो अंदाज खरा ठरला आहे. 

यंदा देशात सरासरीइतका पाऊस पडेल, असा दीर्घकालीन अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेली दोन-तीन वर्षे देशाच्या अनेक भागांत समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यंदा पाऊसमान चांगले राहिले, तर ही परिस्थिती सुधारू शकेल, अशी आशा आहे. एल-निनो परिणामाची तीव्रता कमी होत असल्याने भारतीय उपखंडातील पाऊसमान व्यवस्थित राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUWCB
Similar Posts
मान्सून २१ जूनला महाराष्ट्रात! पुणे/मुंबई : वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर झालेला दुष्परिणाम आता ओसरला असून, कर्नाटकात येऊन थांबलेल्या मोसमी वाऱ्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. त्यामुळे २१ जून रोजी मान्सून गोवा आणि कोकणात दाखल होणार असून, २४-२५ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे
नऊ वर्षांचा चित्रकार ‘रेखाटे आईची महती’; त्याची जगभर कीर्ती ‘माय मदर अँड मदर्स इन नेबरहूड’ (माझी आई आणि शेजारपाजारच्या आया) या चित्राची सध्या विविध समाजमाध्यमांवर जगभर चर्चा आहे. त्याचं कारणही तसंच आहे. केरळमधल्या अनुजाथ सिंधू विनयलाल नावाच्या एका बालचित्रकारानं काढलेलं ते चित्र आहे. तो आता १४ वर्षांचा असला, तरी त्याने नऊ वर्षांचा असतानाच हे चित्र काढलं होतं
शेअर बाजाराची मदार पावसाळ्यावर रिझर्व्ह बँकेने वाढवलेले रेपो दर, जागतिक बाजारात इंधनाच्या दरात होणारे चढ-उतार याकडे शेअर बाजाराने दुर्लक्ष केले असून, शेअर बाजाराची सगळी मदार आता पावसाळ्यावर राहील. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
पाऊस ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता ’ मध्ये आज पाहू या कवी विठ्ठल वाघ यांची ‘पाऊस’ ही कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language